गोंंदिया,दि.23ःभाजप नेते स्व.गणेशभाऊ हेमणे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त भव्य आरोग्य शिबीर आणि गुणवंत विद्यार्थी तसेच परिसरातील आशासेविका व अगंणवाडीसेविकांचा सत्कार सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजन
माजी नगरसेविका सुनिता चंद्रभान तरोणे (हेमणे) तसेच चंद्रभान तरोणे व हेमणे परिवाराकडून करण्यात आले होते.या आरोग्य शिबीराचा 400 नागरिकांनी लाभ घेतला.शिबिरात बीपी, शुगर थायरॉइड सारख्या विविध रोगाची तपासणी करण्यात आली.तसेच 10 व 12 वी मधील 20 गुणवंत विदयार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.नीटमध्येही उत्तीर्ण झालेल्या 2 विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.आशासेविका व अंंगणवाडी सेविकांचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक््रमाचे उद्घाटन माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष येसुलाल उपराडे,अमित झाॅ,विजयभाऊ शिवणकर,संजुभाऊ कुलकर्णी,गज्जुभाऊ फुंडे,नेतरामभाउ कटरे,नंदूभाऊ बिसेन,भरत श्रत्रिय,प्रशांत कटरे,शंभु ठाकुर,महेश आहुजा,नारी चांदवानी,गुडडू चांदवानी,महिला आघाड़ीच्या रचनाताई गहाने,सिताताई रहांगडाले, खिलेशवरीताई बघेले, जिल्हाध्यक्ष सौ.भावनाताई कदम,शालिनी डोगरे,अर्चना मडावी,चित्रकला चौधरी,मिना शहारे,सविताताई बेदरकर,बबली चौधरी,मधु अग्रवाल,मैथुला बिसेन,धर्मिष्ठा सेंगर,सुभा भारद्वाज,प्रमिला सिद्रामे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.आयोजनाकरीता
हिरामन डोगरवार, मधुभाऊ मेढे, रामचंद्र बिसेन, मुकेश राखडे, धनवंतराव शिवणकर, कटरे सर, राजेन्द्र भरने,शत्रुघ्न बहेकार, सुरेंद्र शेडे,लक्ष्मण भुते, अर्जुन शेडे, घनश्याम शेडे, विजेश शेडे, दिलीप मेढे, उमाशंकर देशकर, विठोबा गायधने, अरून रोकडे,संतोष ठवरे, केशोराव मेंढे सह अनेकांनी सहकार्य केले.