गोरठाजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात पोकरटोलाच्या 2 महिलांचा मृत्यू

0
16

गोंदिया,दि.28ः– गोंदिया-आमगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरठाजवळील कालव्याजवळी आमगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टिप्परने मोटारसायकलस्वारास दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज(दि.28)दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.टिप्पर क्रमांक एमएच 35 एजे1021 ने मोटारसायकल क्रमांक एमएच 35 एम 7565 ला धडक दिली.मृत महिलामध्ये सत्यशिला ब्रिजलाल बिसेन(36) व सुनीता सूरजलाल बिसेन(23)रा.पोकरटोला(टेकरी) यांचा समावेश आहे.ठाणा येथे आपल्या मुलीच्या येथील घरगुती कार्यक्रम आटोपून दिपक ब्रिजलाल बिसेनसोबत मोटारसायकलने गावाकडे जात असतांना ही घटना घडली.मोटारसायकलचालक दिपक बिसेन गंभीर जखमी असल्याने त्यास आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.