18 हजाराची लाच घेताना गिधाडीच्या तलाठीसह कोतवाल गजाआड

0
51

गोंदिया,दि.29ः गोरेगाव तालुक्यातील मोहाडी मंडळ कार्यालयांतर्गत येत असलेल्या गिधाडी येथील तलाठी व कोतवालास 18 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 28 सप्टेबंर रोजी रंगेहाथ अटक केली.तक्रारदार 62 वर्षीय गिधाडी निवासी महिला आहे.आरोपी लोकसेवकात मधुकर नकटु टेम्भुर्णीकर वय 55 वर्ष धंदा नोकरी पद तलाठी त.सा.क्र 13 ,गिधाडी, मंडळ कार्यालय मोहाडी,ता गोरेगाव जिल्हा गोंदिया रा.गायत्री मदिंर समोर हीरापुर रोड, गोरेगाव जि. गोंदिया व
राकेश संपत वालदे वय 38 वर्ष पद कोतवाल ,तलाठी कार्यालय गिधाडी रा. गिधाडी ता.गोरेगाव जि.गोंदिया यांचा समावेश आहे.

तक्रारदार या शेतकरी असून तक्रारदार यांचे पतीस ३ भाऊ व ४ विवाहित बहीणी आहेत .तक्रारदार यांच्या दिराचे लग्न झाले नसून तक्रारदार यांचे कडे राहण्यास होते. त्यानी त्यांचे आजारपणामुळे त्यांची गिधाडी भु.क्र .1 खा.क्र 357 मधे असलेली 1 हेक्टर शेती तक्रारदार यांचे नावाने मृत्यु पत्र लेखा अन्वये दि .15.11.2022 रोजी लिहून देऊन दुय्यम निबंधक कार्यालय गोरेगाव येथे दस्त क्र 1676 प्रमाणे नोंदणी करुण दिले आहे.तक्रारादार यांचे दिराचे मृत्यु नंतर मृत्यु पत्रा नुसार दिराचे नावे असलेली जमीन तक्रारदार यांचे नावाने फेरफारकरीता मार्च २०२३ मध्ये तलाठी कार्यालय येथे कागदपत्रे दिली असता फेरफार करुण देणेकरीता आलोसे क्रमांक 1 यांनी आलोसे क्रमांक 2 यांचे मार्फतीने रु 20000/- लाच रकमेची पंचा समक्ष मागणी करुण तडजोडीअन्ती रु 18000/- लाचेची मागणी करुण आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचे समक्ष लाच स्वीकारली. यातील दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वता:च्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला.आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन – गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई विलास काळे
पोलीस उप अधीक्षक यांच्या नेतृत्वात सापळा अधिकारी पो.नि. उमाकांत उगले,सपोनी अतुल तवाड़े, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे,पो. हवा. संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे,नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी संगीता पटले ,रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांनी केली.