नव्याने आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा होणार… शिक्षक सहकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश

0
30
वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिक्षक सहकार संघटनेला शिक्षण मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला

गोंदिया,दि.04- सन 2017 पासून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होत्या पण दिनांक 21.06.2023 शिक्षण विभागाच्या व दि.२३.०८.२०२३चा ग्रामविकास विभाग च्या शासन निर्णय नुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या रद्द केले आहेत .भ्रष्टाचारमुक्त आँनलाईन बदल्या रद्द करुन पुन्हा शिक्षक बदल्यात भ्रष्टाचार करणारा शिक्षण विभाग व ग्रामविकास चा आँफलाईन बदल्यांचा आदेश आहे. यामुळे महाराष्ट्रभर जिल्हा परिषद शिक्षकांत संतापाची प्रचंड लाट निर्माण झाली होती. म्हणून 21जून चा शासन निर्णय रद्द करावे म्हणून शिक्षक सहकार संघटना ने १० हजार शिक्षकांचे स्वाक्षरी चे निवेदन दिले व दि.२४.०८.२०२३ ला आझाद मैदान वर शेकडो शिक्षकानी आन्दोलन केले होते.. तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर याचिका दाखल केली होती… पण 28/10/2023ला मुंबई येथे झालेल्या सभेत मा.*संतोष पिट्टलावाड राज्याध्यक्ष यांनी मा. शिक्षणमंत्रींना सांगितले की जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा 6 टप्पा शासननसध्या राबत आसुन 2022 मध्ये आँनलाईन अर्ज केलेल्या शिक्षकांचाच विचार करुन तो टप्पा राबवित आहे. काही शिक्षकांनी 2022ला 4 जिल्ह्याचे पर्याय असल्याने शेजारच्या जिल्ह्यात जागा असल्याने शेजारच्या जिल्ह्याच पर्याय दिला होता. काही शिक्षकांचे संवर्ग बदलेले आहेत. काही शिक्षकांचे अर्ज चुकल्या मुळे बाद झालेले आहे. 2022 ला संवर्ग 4 मध्ये अर्ज केलेल्या महिला शिक्षकांचे संवर्ग बदलेले आहेत.त्यामुळे ज्यांचे संवर्ग बदलले असतील त्यांना संवर्ग बदलण्याची संधी देणे गरजेचे आहे. तसेच ज्यांचे फाँर्म भरायचे राहीले असतील. त्यांनाही संधी मिळणे गरजेचे आहे. म्हणून नविन भरती पुर्वी आंतरजिल्हा बदलीचा तातडीने 6 वा टप्पा राबवाव व 2022 मध्ये अर्ज भरलेले यांना फाँर्म एडीट करण्याची संधी व 2022 मध्ये अर्ज न भरलेल्या सर्व बदलीपात्र झालेल्या शिक्षकांना नव्याने अर्ज करण्याची विनंती 28 आँक्टोबरच्या झालेल्या बैठकित संतोष पिट्टलवाड राज्याध्यक्ष यांनी शिक्षण मंत्री दिपजी केसकर साहेब यांना केली होती. त्या दिवशी त्यांना समावेश करुन सर्वांना संधी देण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री दिले होते.ते आश्वासन मंत्री महोदयांनी ६ व्या टप्प्यात संधी देऊन पुर्ण केले आहे.दिनांक 3/11/2023 आदेश शिक्षण विभागाणे दिला आसुन सर्वांचाच समावेश ६ व्या टप्प्यात केला जाणार आहे.

डिजिटलच्या दुनियेत पूर्ण जग ऑनलाइन कार्यशैली स्वीकारत आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने सुद्धा शिक्षकांचे दरवर्षी आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली ऑनलाइनच ठेवाव्या.
रवी अम्बुले
विभागीय अध्यक्ष
शिक्षक सहकार संघटना नागपूर विभाग