36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता मेळघाटात एसटी बस दरीत कोसळली; दोन महिलांचा मृत्‍यू

मेळघाटात एसटी बस दरीत कोसळली; दोन महिलांचा मृत्‍यू

0
35

blank

अमरावती : मेळघाटातील सेमाडोह नजीक एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात दोन महिलांचा मृत्‍यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी ११.३० वाजताच्‍या सुमारास घडला. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

अमरावती वरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच ०७ / ९४७८ क्रमांकाची बस परतवाडा घटांग, सेमाडोह मार्गे तूकईथड येथे जात असताना हा अपघात झाला. सेमाडोह नजीक जवाहर कुंड येथे ही बस सुमारे ३० फूट खोल दरीत कोसळली. इंदू समाधान गंत्रे (६५, रा. साठमोरी, खकनार, म.प्र.) , ललिता चिमोटे (३०, रा. बुरडघाट) अशी मृत महिलांची नावे आहेत. अपघातातील जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्‍यात आले आहे.घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर ओमप्रकाश तिवारी सुनील येवले शिवा काकड प्रदीप सेमलकर, लाला कासदेकर बाबू दहीकर असे सेमाडो येथील अनेक जण मदतीला धावले. घटनास्थळी चिखलदरा पोलीस पोहोचले.

blank