भंडारा-गोंदिया सुनिल मेंढे व गडचिरोली-चिमूरकरीता अशोक नेतेंना भाजपची उमेदवारी जाहीर

0
17

गोंदिया/नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने आज पाचवी व महाराष्ट्राची तिसरी यादी जाहीर केली.यात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांना व गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघातून तिसर्यांदा अशोक नेते यांना रिंगणात उतरवले आहे.

भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यासोबत “महाराष्ट्र”तील तीन उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यासोबतच, गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते (Ashok Nete) आणि सोलापूरमधून राम सातपुते (Ram Satpute) यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

भाजपने लोकसभेसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपने कंगणा राणौत सह छोट्या पडद्यावर ‘श्रीरामाची’ भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल (Arun Govil) यांनाही लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील दोन विद्यमान खासदारांना संधी

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातूनही पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी देण्यात आली आहे. सुनील मेंढे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते गेले पाच वर्षे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तर अशोक नेते यांची ही लोकसभा निवडनुकीची तिसरी वेळ आहे. अशोक नेते गेले दहा वर्ष गडचिरोलीचे खासदार आहेत.

 

अभिनेत्री कंगना राणौतला भाजपकडून उमेदवारी

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला भाजपने उमेदवारी दिली आहे. तर उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघात अभिनेता अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या 111 भाजप उमेदवारांमध्ये तीन उमेदवारी महाराष्ट्रातील आहेत. भाजपची ही महाराष्ट्रातील तिसरी यादी आहे.

  • मंडी – कंगना राणौत
  • मेरठ – अरुण गोविल

महाराष्ट्रातील भाजपची तिसरी यादी