विनानंबर प्लेटची महिंद्रा थार चारचाकी पोलिसांना दिसली अन्…१५ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
22
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे:- वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत ०२ देशी बनावटीचे पिस्टलसह ०४ जिवंत राऊंड व एक महिंद्रा थारगाडी असा एकूण १५,६०,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पोलिस पुढील तपास करत आहेत.

वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत सह्याद्री शाळा चौक, वारजे पुणे येथे ०५/०४/२०२४ रोजी दुपारी वारजे माळवाडी वाहतुक विभागाचे पोलिस अंमलदार विशाल भिलारे हे त्यांचे इतर दोन सहकारी महिला पोलिस अंमलदार घाडगे व चव्हाण यांचे समवेत वाहतूक नियमानाचे कर्तव्य करत होते. त्यांना गणपती माथाकडुन वारजे ब्रिजचे दिशेने एक डार्कग्रिण व काळ्या रंगाची तसेच संपुर्ण काळ्या काचा असलेली विनानंबर प्लेटची महिंद्रा थार चारचाकी गाडी येत असताना दिसली. त्यावर पोलिस अंमलदार भिलारे यांना संशय आल्याने सदरची गाडी त्यांनी त्यांचे सोबत असलेल्या महिला पोलिस अंमलदार यांचे सहाय्याने बाजुला घेतली असता गाडी मध्ये त्यांना दोन जण दिसुन आले. त्यातील चालक यांचे कडे ते विचारपुस करत असताना ते त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देवू लागले व सहकार्य करत नसल्याने पोलिस अंमलदार भिलारे यांना त्यांचेवर संशय आला. त्यामुळे त्यांनी लगेच अधिक पोलिस मदतीसाठी वारजे माळवाडी पोलिस स्टेशन येथे संपर्क करुन वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांचे सोबत तपास पथकातील पोलिस स्टाफ सह सदर ठिकाणी तात्काळ हजर झाले.

वारजे तपास पथकाचे अधिकारी अंमलदार हे सदर ठिकाणी येताच दोन्ही संशयीत त्यांचेकडे असलेली थारगाडी तेथेच सोडून वेगवेगळ्या दिशेला पळून जावू लागले. त्यामुळे तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी दोघांना पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेवून सह्याद्री शाळा चौक येथे घेवून आले. दोघांकडे कसुन विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नाव १) अनिरुद्ध ऊर्फ विकी बाळु राजु जाधव (वय २६, रा. रावेत गाव, जाधव वस्ती, पिंपरी चिंचवड, ता. हवेली, जि पुणे) व २) निखिल राजु सरोदे (वय ३० वर्षे, रा. डिलक्स चौक शेजारी, गणपती मंदिरासमोर, पिंपरी, पुणे) असे असल्याचे सांगितले. त्यावर त्यांची अंगझडती घेतली असता त्यातील आरोपी अनिरुद्ध ऊर्फ विकी बाळु राजु जाधव याचे ताब्यातून ०१ पिस्टल व ०३ जिवंत राऊंड तसेच महिंद्रा थारगाडी जप्त करण्यात आले. त्यावर दोन्ही आरोपीं बाबत अधिक माहिती घेतली असता यातील दोन्ही आरोपी हे पिंपरी चिंचवड भागातील सराईत गुन्हेगार असल्याची तसेच यातील अनिरुद्ध ऊर्फ विकी बाळु राजु जाधव हा पिंपरी चिंववड भागातील रावन टोळीचा म्होरक्या असल्याची तसेच त्यास पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांकरीता तडीपार केले असल्याबाबत माहिती मिळुन आली. त्यामुळे वारजे माळवाडी पोलिस स्टेशन येथे गु. रजि.नं. १३९/२०२४ भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ व ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून दाखल गुन्ह्याचे तपासा मध्ये यातील आरोपी निखिल राजु सरोदे याचे ताब्यातुन आणखी ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत राऊड जप्त करण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर हे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस उपआयुक्त परिमंडळ ०३, पुणे संभाजी कदम, सहा. पोलिस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे, वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलिस उप निरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलिस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, मनोज पवार, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, संभाजी दराडे, अजय कामठे, सत्यजित लोंढे तसेच वारजे वाहतुक विभागाचे विशाल भिलारे व महिला पोलिस अंमलदार घाडगे, चव्हाण यांनी केली आहे.