एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांनी केली अटक

0
4

# महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस.

गडचिरोली,दि.०३ः टीसीओसी कालावधीच्या दरम्यान गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास आज दिनांक 03/05/2024 रोजी अटक केले आहे.

आज दिनांक 03/05/2024 रोजी 19 मार्च 2024 ला उप-पोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मोदुमडगु जंगल परीसरात झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने उप-पोस्टे रेपनपल्ली येथे दाखल अप. क्र. 01/2024 कलम 307, 353, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, कलम 135 मपोका, 3, 25, 5, 27 भाहका, कलम 3,4,5 भास्फोका, कलम 13, 16, 18, 20, 23, युएपीए अधिनियम मधील जहाल माओवादी नामे शंकर वंगा कुडयाम, वय-34 वर्षे, रा. कांडलापारती, पो. तह. भोपालपट्टनम, जि. बिजापुर (छ.ग.) यास सिरोंचा पोस्ट पार्टी व विशेष अभियान पथकाने सिरोंचा ते कालेश्वरम (तेलगंणा) जाणा­या रोडवर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली.

अधिक तपासात असे दिसून आले की, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे, स्फोटके लावने अशी कामे तो करीत होता.

अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती

1) नाव- शंकर वंगा कुडयाम

 दलममधील कार्यकाळ
 सन 2015 पासुन नॅशनल एरिया कमिटीमध्ये भरती होवुन आजपर्यत माओवादी चळवळीतील कामे करत होता.

 कार्यकाळात केलेले गुन्हे
 चकमक – 04
 सन 2022 मध्ये मोरमेड-चिंतलपल्ली (छ.ग.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
 सन 2023 मध्ये बडा-काकलेर (छ.ग.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
 सन 2023 मध्ये झालेल्या डम्मुर-बारेगुडा (छ.ग.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
 सन 2024 मध्ये झालेल्या लिंगमपल्ली-मोदुमडगु (म.रा.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता. ज्यामध्ये 04 माओवादयांना ठार करण्यात सुरक्षा दलास यश आले होते.

सन 2024 मध्ये मौजा कोरंजेड येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. सन 2024 मध्ये मौजा कचलेर येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. भोपालपट्टनम (छ.ग.) येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. शासनाने शंकर वंगा कुडयाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 79 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.