अज्ञात वाहनाने बैलगाडीला उडविले; शेतकर्‍याचा मृत्यू, बैलही जखमी

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिरोडा : तणस आणण्यासाठी जात असलेल्या बैलगाडीला अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली. या घटनेत बैलगाडी हाकणार्‍या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. त्याचबरोबर बैलही जखमी झाले. ही घटना (ता.४) सकाळी ६ वाजता सुमारास मुंडीकोटा पुलाजवळ घडली. चुन्नीलाल हरिणखेडे (६५) असे मृताचे तर रामलाल पटले (५५) दोन्ही रा.पांजरा असे जखमीचे नाव आहे.

अज्ञात वाहन चालकाची लापरवाही
माहितीनुसार, तालुक्यातील पांजरा येथील चुन्नीलाल हरिणखेडे व रामलाल पटले हे दोघे जण सकाळी ६ वाजता सुमारास तणस आणण्यासाठी बैलगाडीने शेताकडे निघाले. दरम्यान मुंडीकोटा महामार्गावरील पुलाजवळ अज्ञात वाहन चालकाने लापरवाहीने चालवून बैलगाडीला जबर धडक दिली. या घटनेत चुन्नीलाल व रामलाल या दोघांसह बैलही जखमी झाले. दरम्यान दोन्ही जखमींना तुर्त उपचारासाठी भंडारा येथे नेत असतानाच रस्त्यातच चुन्नीलाल हरीणखेडे यांचा मृत्यू झाला. दुसरा जखमी रामलाल पटले याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेत बैलही जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद तिरोडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.