गोंदियात बुद्ध जयंतीची तय्यारी जोरात;23 मे रोजी रॅलीचे आयोजन

0
11

UP चे भन्ते करुणाकरण यांची उपस्थिती

निशा बौद्ध यांची संगीतमय मैफल

गोंदिया ता.5:– डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीच्या वतीने पुढील महिन्यात होणाऱ्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त तय्यारी सुरु झाली आहे.येथील भीमनगरच्या भव्य मैदानावर ता.23 आणि 24 मे रोजी दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित आहे.
दिनांक 23 मे रोजी रॅलीचे आयोजन असून ही रॅली शहरात भ्रमण करून तथागत बुद्धांचा संदेश प्रसारित करेल.
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयु. गेंदलाल तिरपुडे यांनी दिलेल्या माहिती नुसार या दोन दिवशीय कार्यक्रमा दरम्यान दिनांक 24 मे रोजी,उत्तर प्रदेश येथील धम्मगुरु भन्ते करुणाकरण यांचे बुद्ध तत्वज्ञान आणि संवैधानिक राजकारण या वर प्रबोधन होईल.तसेच राजस्थान भरतपूर येथील बहुजन मिस्सनरी गायिका निशा बौद्ध यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय जयंती समितीने घेतल्याचे माध्यमाना सांगितले.श्री तिरपुडे यांनी, बहुजन समाजाने बुद्ध जयंतीदिनी घरोघरी विद्युत रोषणाई करावी, पंचशील ध्वज उभारावेत,हातात मेणबत्त्या घेऊन बुद्धविहारात जाणे, आणि शेजारी पाजारी तसेच आगंतुकांना सुजाता खीरचे वितरण करून बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन धम्म बांधवाना केले आहे.