राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या…वर्धेचे हसन भंडाराचे पोलीस अधिक्षक

0
339
 भंडारा,दि.२३ःराज्याच्या गृह विभागाने आज राज्य पोलिस दलातील भारतीय पोलिस सेवेतील आयपीएस  अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने हे आदेश आजच काढण्यात आले आहेत.
 विदर्भातील वर्धेला जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर राहिलेले एके काळचे भारतातील सर्वात कमी वयाचे आयपीएस नुरुल हसन यांची वर्धेतून एसआरपी मध्ये झालेली बदली रद्द करून त्यांना भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती या आदेशान्वये देण्यात आली आहे.तर भंडारा येथील पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.मतानी यांची बदली करण्यात नागपूरातील भाजपच्या एका आमदाराचा पुढाकार असल्याचे बोलले जात आहे.