फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराचा निषेध

0
1228

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार
अर्जुनी मोर.-संतश्री गाडगेबाबा यांचेबाबत एका इसमाने फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून परीट धोबी समाजाच्या भावना दुखावल्या. समाज बांधवांनी बुधवारी(४) या घटनेचा निषेध करत उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले. संबंधित इसमावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
संतश्री गाडगेबाबा हे परीट धोबी समाजाचे श्रद्धास्थान आहेत.त्यांचेबाबत फेसबुकवर विजय शेंडगे यांनी गाडगेबाबा आदर्श नाहीत. यासारख्या आणखी आक्षेपार्ह पोस्ट घालून समाजबांधवांच्या भावना दुखावल्या. समाजाच्या काही लोकांनी नाराजी व्यक्त केल्यावर त्या इसमाने ती पोस्ट फेसबुकवरून काढून घेतली. त्याच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. उलट व्हाट्सअप वरून अत्यंत उर्मट भाषेत प्रतिउत्तर देत आहे. सोमवार (२) च्या मध्यरात्री त्याने इतर जातीचा उल्लेख करत भावना दुखावल्या. या इसमावर प्रचलित कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावी अशा मागणीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावे असलेले निवेदन स्थानिक तहसीलदार व ठाणेदारांना दिले आहे.
यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष सनत वाढई,संत गाडगेबाबा उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक भाग्यवंत, सचिव सचिन मेश्राम, सुनील लांजेवार, कृष्णकुमार वाढई, विकास कावळे, प्रेमदास बोरकर, संजय पिल्लेवान उपस्थित होते.