अमरावतीत भरदिवसा युवकाची चाकूने हत्‍या

0
63

अमरावती : येथील गाडगेनगर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील शोभानगर परिसरात एका युवकावर तिघांनी चाकूने हल्‍ला करून त्‍याची हत्‍या केल्‍याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्‍या सुमारास घडली. पूर्ववैमनस्‍यातून ही हत्‍या करण्‍यात आल्‍याचा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. रोहित रतन पाल (१९, रा. मांडवा झोपडपट्टी) असे मृत युवकाचे नाव आहे.

रोहित पाल हा शोभा नगर परिसरातील एका पानटपरीनजीक सकाळी ११ वाजताच्‍या सुमारास मित्रासोबत बोलत उभा होता. त्‍याचवेळी तीन हल्‍लेखोर तेथे पोहचले. त्‍यांनी अचानकपणे रोहितवर चाकूने वार करण्‍यास सुरूवात केली. या जीवघेण्‍या हल्‍ल्‍यात रोहितचा जागीच मृत्‍यू झाला. हल्‍लेखोर लगेच पळून गेले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्‍थळी पोहचून तपास सुरू केला. जुन्‍या वैमनस्‍यातून रोहितची हत्‍या करण्‍यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्‍ही तपासण्‍याचे काम हाती घेतले आहे.