अर्जुनी मोर.– 63 अर्जुनी मोर.विधानसभेची निवडणुक 20 नोव्हेंबर ला पार पडली.23 नोव्हेंबर ला अर्जुनी मोर. कृषी उत्पन्न बाजार समितीत मतमोजणी होणार आहे.या विधानसभेत 70 टक्के मतदान झाले आहे.19 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे.मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे दिलीप बन्सोड यांचे पंजा व महायुतीचे ईंजी.राजकुमार बडोले यांचे घडी चिन्हातच होणार अशा चर्चा मतदानानंतर रंगु लागल्या आहेत.
अर्जुनी मोर, सडक/अर्जुनी, व गोरेगाव तालुक्यातील 54 बुथ मिळुन आंबेतलाव ते गौरनगर ते राजोली, भरनोली,ईळदा पर्यंत अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र तयार झाला आहे.या क्षेत्रात एकुण 319 बुथवरुन मतदान प्रक्रिया पार पडली .नक्षलप्रभावीत संवेदनशील क्षेत्र असल्याने मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असली तरी अत्यंत शांततेत मतदान पार पडले.मतदारांनी स्वंयस्फुर्तीने मतदान केल्याने या क्षेत्रात 70 टक्के मतदान झाले.
या मतदार संघात 1 लक्ष 28 हजार 970 पुरुष तर 1 लक्ष 29 हजार 996 महीला असे एकुण 2 लक्ष 58 हजार 966 मतदार आहेत.यापैकी 90 हजार 680 पुरुष मतदार तर 90 हजार 606 महीला असे एकुण 1 लक्ष 81 हजार 286 एकुण मतदारांनी मतदान केले मतदानाची टक्केवारी 70 टक्के आहे. 19 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार असल्याने उमेदवारांसह कार्यकर्ते व मतदारांमधे निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. 19 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महाविकास आघाडीचे दिलीप बन्सोड, व महायुतीचे उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांचेतच काट्याची लढत होणार असल्याच्या चर्चा आहेत.कारण या दोन्हीच पक्षांकडे गट्टा मते असुन अपक्ष उमेदवारांना एक मतांपासुन सुरवात करावी लागत असल्याने ते विजयापासुन बरेच लांब आहेत.अशाही चर्चा मतदानानंतर रंगु लागल्या आहेत. मात्र अपक्ष उमेदवारांनी हाॅयटेक प्रचार करुन निवडणुकीत रंगत आणली होती हे विशेष. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात विक्रमी मतदान झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले ,महाविकास आघाडीचे दिलीप बनसोड, प्रहार जनशक्ती पक्षाचे सुगत चंद्रिकापुरे व अपक्ष उमेदवार अजय लांजेवार या चौघांनाही सध्या तरी विजयाची खात्री आहे. असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रात कुणाचा विजय होणार आणि कुणाला पराभवाला समोर जावे लागते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून याचा फैसला आज मतमोजणी नंतर होणार आहे.अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले हे गेल्या दोन महिन्यापासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात गल्ली गल्लीत फिरत आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून तर 19 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदारांशी संपर्क ठेवला. आणि मतदान झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीत रमले. यावेळी राजकुमार बडोले यांना या मतदारसंघात प्रचंड सहानुभूती व आपुलकी असल्याने त्यांचा विजय सध्यातरी निश्चित मानल्या जात आहे. अशा चर्चा आता मतदारसंघात सुरू झाले आहेत.