भंडारा, दि.14 : जिल्हयातील ग्रामीण आरोग्य सुविधेत पाच नविन रूग्णवाहीका दाखल झाल्या आहेत.त्यातील प्रा. आ. केंद्र खांबा व गोंडउमरी येथे नानाभाऊ पटोले (आमदार साकोली विधानसभा क्षेत्र) यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाले असून महाराष्ट्र राज्य शासनाकडून पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार नाना पटोले यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार नानाभाऊ पटोले यांनी सांगितले कि, समर्पण भावनेने रुग्णसेवा करावी, रुग्णावर प्राथमिक उपचार हे प्रा. आ. केंद्रातच व्हावे. गंभीर रुग्णास तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी याचे अचूक नियोजन करावे. रुग्णवाहिका उपलब्ध झाली म्हणून रुग्णास रेफर टू साकोली किंवा भंडारा करू नये. रुग्णवाहिकेमुळे गरजू रुग्णांना विना विलंब पुढील उपचारासाठी पाठवता येईल व ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे अशा शुभेच्छा दिल्या.
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा प्रसंगी समाज कल्याण सभापती मदन रामटेके, जि.प. सदस्य दिपलताताई समरीत, माजी सभापती अंजिरा चुटे, पं. स.सदस्य करुणा वालोदे, माजी पं.स.सदस्य लालचंद लोथे, सरपंच नंदकिशोर समरीत, सरपंच पोर्णिमा चांदेवार, सरपंच माधुरीताई कटरे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, अधिकारी डॉ. आर. डी. बडवाईक, जि.वि.व मा.अधिकारी अनिल बनकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वै.अ. डॉ. पी.जी. कुंभरे, डॉ. राणू शहारे,डॉ.चंदन राठी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,वाहनचालक,अशा कार्यकर्ती व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.