8 किलो गांजा सह 1 लक्ष 67 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

0
98
गांजा वाहतूक करणार्या आरोपीसह पोलीस

गोंदिया,दि.१८ : गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गांज्याची वाहतूक करणार्या दोघांना पावणेदोन लाख रुपयाच्या गांज्यासह ताब्यात घेण्यात आले आहे.ओडीसा येथून रायपुर मार्गे रेल्वेने गांजाची खेप गोंदिया रामनगर परीसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने रेलटोली मालधक्का हनुमान मंदीर समोर गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रोडवर दि.१७ जानेवारी रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.त्या सापळ्यात अवैधरित्या गांज्याची खेप घेवून येणाऱ्यास एका विधीसंघर्ष बालकांसह दोघांना रंगेहाथ पकडले.

आरोपीच्या ताब्यात असलेल्या निळ्या व ग्रे रंगाच्या स्कुल बॅगमध्ये सेलोटेपने गुंडाळलेले (टेपने वेस्टन असलेले) 8 नग बंडल मिळुन आले.वेस्टन असलेल्या बंडलची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फळे, फुले आणि बिया मिश्रीत एकूण वजनी 8 किलो 325 ग्रॅम, उग्र वास येत असलेला गांजा, दोन बॅग असा किंमती एकूण 1 लाख 67 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे.

यात आरोपी नामे देवेंद्रा धनेश्वर बेहरा वय 48 वर्षे, रा.कादलिमुंडा तालुका -किशोर नगर, जिल्हा- अंगुल, राज्य- ओडीसा व एक विधिसंघर्ष बालक वय १७ राह. माहुलमुंडा साही, कादलिमुंडा पो. ठाणे, तालुका – किशोर नगर, जिल्हा- अंगुल, राज्य ओडीसा यांचेविरूध्द सपोनि धीरज राजूरकर यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे रामनगर येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस, विधिसंघर्ष बालक व जप्त मुद्देमाल रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

सदरची धाड कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पो.नि. प्रविण बोरकुटे पो. ठाणे रामनगर यांचे मार्गदर्शनात सपोनी धीरज राजूरकर, पोउपनि शरद सैदाने, पोहवा राजू मिश्रा, महेश मेहर, नेवालाल भेलावे, भूवनलाल देशमुख, सुजित हलमारे, संतोष केदार, दुर्गेश पाटील, चापोशि घनश्याम कुंभलवार, यांनी तसेच पोलीस ठाणे रामनगर पोलीस स्टॉप पो.उप.नि. अमोल वाघमोडे, पोलीस अंमलदार स.फौ. राजेश भुरे, पोहवा. सुनीलसिंह चौव्हाण, सरोज घरडे, पो.शि. कपील नागपुरे, चापोशि. श्याम फुंडे यांनी कारवाई केली आहे.