गोंदिया,दि.०३- जिल्ह्यातील केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजोली येथील मागासवर्गातील एका महिला कामगारास आपल्या घरी रात्रीच्यावेळी जेवण करुन बाहेर मोबाईलवर बोलत असतांना आरोपीने जातीवाचक अश्लिल शिविगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिल्याची घटना २८ जानेवारीला घडली.फिर्यादीच्या तक्रारीनुसार रेवनाथ धर्मा गायकवाड यांनी दारुच्या नशेत येऊन आपले केस ओढून मारहाण केल्याची तक्रार केशोरी पोलीस स्टेशनला नोंदवली असून आपल्या जिविताला धोका असल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे.सदर प्रकरणात अनुसूचित जाती जमाती कायदा(अट्रासिटी)अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम ११५(२), २९६,३२९(३), ३५१(२), ३५१(३),३(१)(आर),३(१)(एस) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणातील आरोपीला मात्र अटक करण्यात आलेली नाही.सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे.