लाखनी,दि.२०ः लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालांदुर ते पिंपळगाव लाखनी मार्गावरील गुरधा जवळ आज २० फेब्रुवारीला झालेल्या अपघातात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येगाव जानवा येथील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर अपघात हा चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३३,एसी ०६५२ व ट्रकसोबत झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.या अपघातात ३ चा मृत्यू झाला असून १ व्यक्ती जखमी असल्याचे वृत्त आहे.