■ प्रसिध्द युवा प्रबोधकार डॉ.प्रशांत ठाकरे यांचे प्रतिपादन.
देवरी,दि.२०:’धर्मचिकित्सक, सर्वांगस्पर्शी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देणारे एक उर्जाकेंद्र होय. त्यांच्याप्रमाणे आपण आपले तारुण्य, संपत्ती, विद्वता ही समाजासाठी, राष्ट्रासाठी खर्च करावी.’ असे प्रतिपादन प्रसिध्द युवा प्रबोधकार डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांनी. स्थानिक छत्रपती शिवाजी संकुलमध्ये १९ फेब्रुवारी रोज बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्तः आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.
या कार्यक्रमा दरम्यान गोंदियाचे सामाजिक कार्यकर्त्या सविता तुरकर, वडेगावचे माजी सरपंच तथा ग्राम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजकुमार रहांगडाले, भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन व देवरी तालुका महिला संघटन उपाध्यक्ष सुनंदा भुरे आणि देवरी येथील धुकेश्वरी मंदीर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष एड. प्रशांत संगीडवार या सत्कारमूर्तीचे स्वागत व सत्कार तसेच वर्ग १० वी व १२ वी मध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यांतून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह स्वागत व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिलकुमार येरणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सुनिलकुमार येरणे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.टी. मेश्राम, चंद्रशेखर बडवाईक व जायस्वाल मॅडम यांनी केले.