ग्रामरोजगार सेवकाला घरकुल लाभर्थ्याकडून लाच घेताना अटक

0
1219

गोंदिया : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. मजुराची हजेरी तयार करून पाठविण्याची विनंती ग्रामरोजगार सेवकाला केली होती. मात्र ग्रामरोजगार सेवकाने 1200 रुपयाची मागणी करून पंचासमक्ष घेतली . गोंदिया एसीबी ने आरोपी ग्रामरोजगार सेवकाला रंगेहाथ पकडले. आरोपीचे नाव खुमेश भोजराज वघारे वय 27 रा. झिलमिली, ता. जिल्हा गोंदिया असे आहे. ही कारवाई बुधवार 5 मार्च रोजी कऱण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,  यातील तक्रारदार हे शेतमजूर असून त्यांना सन 2024 मधे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून सप्टेंबर 2024 ला पहिला हप्ता रु 15,000 व  22 फेब्रुवारी 2025 रोजी दुसरा हप्ता रु 70,000 तक्रारदार यांचे पोस्टा मधील खात्या मधे जमा झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी रोजगार सेवक यांना घरकुल बांधकामाचे काम करणाऱ्या मजूरांची हजेरी (मस्टर )  तयार करुन पाठवण्याची विनंती केली असता आरोपी इतर लोकसेवक यांनी  मस्टर तयार करुण पाठवुन देण्यासाठी रूपये 1600 दयावे लागतील असे म्हणुन रु 1600 लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि.कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली . तक्रारीच्या आधारावर लाच मागणी पडताळणी दरम्यान तडजोडीअंती आरोपी इतर लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 1200 रुपये लाच रकमेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवीली.
दरम्यान आरोपीने पंचासमक्ष  1200 रू. लाच रक्कम स्वीकारली .लाच रकमेसह आरोपीस ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन रावणवाड़ी जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीच्या अंग झडती मध्ये विवो कंपनी चा मोबाईल फोन. सदर फोनचे परीक्षण करून पुढील तपास करण्याची तजवीज ठेवन्यात आली आहे. आरोपी च्या घर झडती मध्ये रोख रु 31455, 6 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 33205 रु व चांदी चे दागिने वजन 96.5 ग्रॅम वजनाचे  6280 रु किंमतीचे मिळुन आले आहेत. ही कारवाई डॉ.दिगंबर प्रधान  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र पर्यवेक्षक अधिकारी विलास द . काळे पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वी गोंदिया यांच्या मार्गदर्शनात राजीव कर्मलवार पोलीस निरीक्षक, विलास काळे पोलीस उप अधिक्षक, राजीव कर्मलवार पोलीस निरीक्षक, स.फौ.चंद्रकांत करपे, पो. हवा. संजय कुमार बोहरे,मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे,अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने,कैलास काटकर म.ना.पो.शि.संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक पोशि  अल्फ़ाज़ शेख यांनी केली.