शेतकऱ्यांनो पशुपालनातून प्रगती साधणे आहे शक्य-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

0
182

गोरेगाव,दि.०६ : शेतीसह शेतकरी बांधव पशुपालन व्यवसायदेखील करतात. कृषी आणि पशुपालक शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्हा परिषद आहे. जे प्रगत शेतकरी आहेत व ज्यांनी शेती, पशुपालनात क्रांती केली त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन इतर शेतकरीसुद्धा प्रगती साधू शकतात. शेतीला पशुपालनाची जोड देऊन शेतकरी प्रगती साधू शकतो, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले. गोरेगाव पंचायत समिती, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन मेळावा मंगळवारी सोनी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपा चंद्रिकपुरे, बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, पंचायत समिती सभापती चित्रकला चौधरी, उपसभापती रामेश्वर महारवाडे, जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरी बघेले, मनोज बोपचे, किशोरकुमार पारधी, सुप्रिया गणवीर, शशिकला ताराम, हेमेश्वरी हरिणखेडे, झनकलाल चव्हाण, सरिता पुंडे, लीला कोहरे, नरेंद्र मरसकोल्हे, चंद्रसेन पुंडे, शिशूला धारापिंडे, आशा बोपचे, भाऊलाल गौतम, कृष्णाजी बोपचे, साहेबलाल कटरे व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.