घोडाझरी तलावावर गेलेल्या चिमूर तालुक्यातील 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू

0
108

चंद्रपूर : जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात (Lake) बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. उन्हाळ्याचा पारा चढत असल्याने घोडाझरी तलावात दुपारच्या दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच, तलाव पात्रात बुडालेल्या तरुणांना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
तलाव पात्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे असून हे पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवाशी आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाची यंत्रणाही कार्यरत झाली असून घटनास्थळी रवाना झाले आहेत.