39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता कोहमारा चौकात शिवशाहीला अपघात 

कोहमारा चौकात शिवशाहीला अपघात 

0
833

blank

गोंदिया,दि.२२-  नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा चौकात रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणार्‍या भरधाव ट्रकने गोंदियावरून नागपूरकडे जाणार्‍या शिवशाही बस क्रमांक एमएच 06 बीडब्ल्यू 0143 ला आज दुपारी २ वाजेच्या सुमारास धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने दुदैवी घटना घडली नाही, बसमध्ये 19 प्रवासी प्रवास करीत होते.चालकाला किरकोळ जखम झाली असून सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. झाला. सुदैवाने प्रवासी सुरक्षित आहेत. अपघातात मात्र बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस व राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.यावेळी ट्रकचालकाने घटनास्थळी न थांबता ट्रकसह पोबारा केला.

blank