जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला ११ हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

0
17973

लाचलुचपत विभागाची कारवाई;रत्नागिरी जिल्ह्यात उडाली खळबळ

रत्नागिरी:-:-रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला ११ हजाराची लाच स्विकारताना आज शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप प्रीतम केदार (५० वर्ष) असे या लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर येथील धान्य गोदाम यास माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी, तहसीलदार संगमेश्वर यांनी दिनांक २२/०३/२०२५ रोजी भेट दिली होती. त्यावेळी तक्रारदार हे गैरहजर होते तसेच त्यानंतर लोकसेवक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री केदार यांनी तक्रारदार यांचे अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे सांगून तसेच गैरहजर असल्याचे सांगून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयांचे लाचेची मागणी केली त्यानुसार लोकसेवक केदार यांनी दिनांक २८/०३/२०२५ रोजी तडजोडीअंती ११,०००/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले व लाच रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे तक्रारदार यांच्याकडून स्वीकारले, लोकसेवक यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही ला . प्र वि. कार्यालय रत्नागिरी येथे सुरू आहे.