आय एम विनर राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात पुणे येथे झाला सन्मान सोहळा
गोंदिया, (दि. 29): आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेचा राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभ नुकताच पुणे येथील विठ्ठल तुपे नाट्यगृह हडपसर येथे थाटात संपन्न झाला. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे ध्येय प्रकाशन अकॅडमी चे जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांना ध्येयरत्न पुरस्काराने ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन च्या संस्थापिका सौ. अर्चना सुदाम शेंडगे व प्रमुख पाहुणे सहायक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांनी सन्मानित केले.
दरवर्षी ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र द्वारा इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या संस्थेचे कार्य गोंदिया जिल्ह्यातील खेड्या पाड्यापर्यंत पोहचवून मागील दोन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात वशिष्ठ खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून दरवर्षी ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र तर्फे या वर्षीचा ध्येयरत्न पुरस्कार देऊन त्यांना सपत्नीक गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.