मुख्याध्यापिका सौ टी.सी.कटरे यांचा सेवानिवृत्ती सत्कार…

0
2444

गोरेगाव,दि.०१ः तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा गणखैरा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ टी.सी.कटरे यांचा सपतीक ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणखैरा केंद्राचे केंद्रप्रमुख एन.एस.हरदुले,से.नि.शिक्षक सी.के.कटरे, शाळेतील शिक्षक सौ.सी.व्ही.साखरे,पी.एस.देशमुख,सौ के.एस.वंजारी,कु.एस. व्ही.गदवार,व्ही.टी.केवट,कु.व्ही.डी.झोडे,जयेंद्र धमगाये शा.व्य. अध्यक्ष,उपाध्यक्ष ओमेश्वर दानी,टी.बी.चौधरी मुख्याध्यापक सटवा,वसंत कुर्हाडे,रेखा रामटेके,रुपाली दानी,सरिता दानी,अश्विनी दानी,प्रमिला बंसोड,किर्ती राऊत, मदतनीस ममता बाई पारधी, सत्यभामा बाई वाघमारे तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम सौ टी. सी. कटरे उच्च श्रेणी मुख्याध्यापिका यांचा शाळेतर्फे तसेच व्यवस्थापन समितीतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांच्या ३७ वर्षे ४ महीने इतक्या विस्तीर्ण सेवाकाळाविषयी, कार्यप्रणाली विषयी उपस्थित मान्यवरांनी माहिती देऊन पुढील सेवानिवृत्ती नंतर च्या आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.