गोंदिया,दि.२८ : स्थानिक गुन्हे शाखेच्या तडाखेबंद कारवाईत एक संशयित तरुण पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून, त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलं व १० जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. हा तरुण गोंदिया येथून बालाघाटकडे अवैध शस्त्रे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर ही कारवाई २७ जुलै करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक नियमित गस्त घालीत असताना त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे एक व्यक्ती मोटारसायकलवरून अवैध अग्निशस्त्रे घेऊन बालाघाटकडे जात आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी त्वरीत गोंदिया-बालाघाट रोड येथील मुरपार गावाजवळ नाकाबंदी लावली. रात्री ८:३० वाजता एक तरूण काळ्या बॅगसह मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव प्रशांत केशव सोनवणे (१८ ) रा. बारो, ता. कोपरगाव, जि.अहिल्यानगर असे सांगितले. त्याची बॅग तपासून एक पिस्तुल लोखंडी, १६ सेमी बॅरल व १० सेमी मूठ किंमत ५० हजार, दुसरी पिस्तुल लोखंडी, १५ सेमी बॅरल व ८.५ सेमी मूठ किंमत ५० हजार, काडतुसे १० नग किंमत ५ हजार असा १ लाख ५ हजाराचे अवैध शस्त्र जप्त केले. या प्रकरणी रावणवाडी पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, संजय चौहान, सोमेन्द्रसिंह तुरकर, छगन विठ्ठले, राकेश इंदुरकर, योगेश रहिले, लक्ष्मण बंजार यांंनी केली आहे.