26 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता अनियंत्रीत कारची झाडाला धडक एक ठार, तीन जखमी

अनियंत्रीत कारची झाडाला धडक एक ठार, तीन जखमी

0
121

घोट : भरधाव वेगाने असलेली कार अनियंत्रीत होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य तिन जण जखमी झाल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घोट – आष्टी मार्गावरील ठाकुरनगर जवळील पहाडीच्या वळनावर घडली. अमन मुज्जफर शेख( २३) रा. अहेरी हल्ली मुक्काम घोट असे मृतकाचे नांव आहे. सचिन शेखर अधिकारी (३१) , अभय शंकर रॉय (२२) व निखील नरेश राऊत(२३) तिघेही राहणार घोट अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार अमन हा आपल्या मित्रासह एम एच ३३ ए ४१ ४१ या क्रमांकाच्या मारुती सुजुकी कारने आष्टी कडून घोट कडे येत असतांना कार अनियंत्रीत होऊन सागवनच्या झाडाला धडक बसली.अपघातात जखमी सचिन अधिकारी हा चंद्रपूर येथे उपचार घेत आहे तर अभय रॉय व निखील राऊत हे गडचिरोली येथे उपचार घेत आहेत. या घटनेचा तपास घोट पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले करीत आहेत. मृतक अमन हा लहान पणापासुन आजीकडे घोट येथेच राहत होता . तो अत्यंत शांत ,संयमी होता. अमनच्या अचानक अपघाती निधनाने घोट येथे शोककळा पसरली असून त्याच्या पार्थीवावर वडिलांच्या मूळ गावी अहेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.