31.4 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home गुन्हेवार्ता मनसे नेते राजू उंबरकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा

मनसे नेते राजू उंबरकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा

0
75

यवतमाळ-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजय सुदाम हिंगाणे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. खंडणी मागताना साइट इंजिनीअर सागर तन्नीरवार आणि नीरपेंद्र पटेल यांच्यासह सुपरवायजर आकाश उईके आणि मजुरांना उंबरकर व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
वणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, राजू उंबरकर यांनी अजय हिंगाणे, सागर तन्नीरवार आणि नीरपेंद्र पटेल यांना जबरदस्तीने गाडीत बसवून रस्त्याचे बांधकाम दाखवायला घेऊन गेले. दरम्यान उंबरकर यांची माणसे बांधकामाचे फोटो घेत होते. त्यानंतर उंबरकर हिंगाणे व सर्व लोकांना घेऊन कंपनीच्या रासा येथील प्लांटमध्ये घेऊन गेले. तेथे मोठमोठ्याने शिवीगाळ केली, असा आरोपही करण्यात आला.

blank