29.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home गुन्हेवार्ता दुर्गा विसर्जन मिरवणुकीला गालबोट फटाके फोडण्यावरून मारहाण; आरोपींवर गुन्हा दाखल

दुर्गा विसर्जन मिरवणुकीला गालबोट फटाके फोडण्यावरून मारहाण; आरोपींवर गुन्हा दाखल

0
80

गोंदिया ः तुमखेडा खुर्द येथील शारदा चाैकात गुरुवारी (ता. २) रात्री साडेआठच्या सुमारास दुर्गा विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. हयगयीने फटाके फोडणाऱ्यांना हटकणाऱ्या एका युवकासह त्याच्या मित्रांना सात जणांनी आपल्या साथीदारांसह काठीने जबर मारहाण केली. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. शिशुपाल सदाशिव गराडे (वय ३२, रा. तुमखेडा खुर्द) असे जखमीचे नाव आहे.
शिशुपाल गराडे व त्याचे साथीदार हे तुमखेडा खुर्द येथे शारदा मंडळाच्या समोर उभे होते. यावेळी आरोपी लोकेश दिनेश नागपुरे (वय २४), अमित गणेश नागपुरे (वय २१), कृष्णकुमार बसंत लिल्हारे (वय २५), रोहित महेश नागपुरे (वय २०), आेम शिवचरण नागपुरे (वय २४), दुर्गेश जियालाल बन्नाटे (वय २६), प्रदुम लिल्हारे (वय ३०) व त्यांचे साथीदार (सर्व रा. तुमखेडा खुर्द) हे दुर्गा विसर्जन मिरवणुकीत हयगयीने फटाके फोडत होते. त्यामुळे शिशुपाल गराडे याने त्यांना फटाके बाजूला फोडा, असे म्हटले. हाच राग मनात धरून आरोपींनी शिशुपालसह त्याच्या मित्रांना हाताने, पायाने आणि काठीने जबर मारहाण केली. यात शिशुपाल व त्याचे मित्र जखमी झाले. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वीरेंद्र भोसले करीत आहेत.
…………………………