28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home गुन्हेवार्ता अल्पवयीन मुलीवर अत्याचार,हिंदू सकल समाजाच्या आक्रोशानंतर आरोपीवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार,हिंदू सकल समाजाच्या आक्रोशानंतर आरोपीवर गुन्हा दाखल

0
184

गोंदिया,दि.१८- तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका मुस्लिम तरुणावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करीत सकल हिंदू समाजाच्यावतीने रामनगर पोलीस स्टेशनच्या निरिक्षक प्रविण बोरकुटे यांना निवेदन देण्यात आले.याप्रकरणातील संशयीत आरोपी तरुणाला रामनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती आंदोलकांना पोलिसांनी दिली.

येथील रामनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका मुस्लिम तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.आरोपीने पीडित मुलीला मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पीडित मुलीने आपल्या वडिलांना दिली.त्यानंतर वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेले असता आधी तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.त्यानंतर पिडीतेच्या वडीलांनी सकल हिंदू समाजाच्या प्रमुखांना माहिती दिल्यानंतर समाजाचे प्रतिनिधी पोलीस स्टेशनला पोचून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन कठोर कारवाईची मागणी रेठून धरली.त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून आज न्यायालयात हजर केले आहे.