31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता किडंगीपार दारूमुक्तीच्या लढ्यातील मुख्य आंदोलकांना पून्हा ३ दिवसांची पोलीस कोठडी

किडंगीपार दारूमुक्तीच्या लढ्यातील मुख्य आंदोलकांना पून्हा ३ दिवसांची पोलीस कोठडी

0
188

आमगाव : – तालुक्यातील किडंगीपार येथील दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावी याकरिता आंदोलन उभारणाऱ्या आंदोलकांना नोटीस बजावण्याकरता गेलेल्या पोलिसांशी गैरवर्तणूक व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संतोष दोनोडे, सौ चारुलता दोनोडे, कुमारी वैष्णवी दोनोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. व त्यांना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठळी सुनावण्यात आली आहे.
व ६ एप्रिल रोजी आंदोलकांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संतप्त जमावाने दगडफेक केली होती या हिंसक संघर्षात ६ पोलीस अधिकारी आणि ३५ कर्मचाऱ्यांसह अनेक ग्रामस्थ जखमी झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या महिला पुरुष असे सुमारे ६० ते ७० व्यक्तींवर अप क्र 241/2026 कलम 132,221 (1), 121(2),352,189(2),189(3),189(4),191 ,191(1) 191(2) 191(3), 61(2), 126(2) भा.न्या.सं. 2023 सहकलम 135 मपोका या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलकांनी या प्रकरणाचे गांभीर्य बघता आज १० एप्रिल रोजी होणाऱ्या रास्ता रोको, रेल्वे रोको आंदोलन तूर्तास मागे घेतले व दारूबंदीसाठी प्रभाग क्रमांक सहा मध्ये शक्य तितक्या लवकर निवडणूक प्रक्रिया राबवून व या प्रकरणाच्या वस्तुनिष्ठ आढावा घेऊन स्थानिक नागरिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी आग्रही विनंती गावकऱ्यांनी केली आहे.