गोंदियाः बनावट आयही तयार करून सोशल मिडीयावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरूध्द आक्षेपार्ह संदेश पोस्ट करून प्रसारित करणाऱ्याविरूध्द डुग्गीपार पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आहे. आरोपी गौरेश बावणकर रा. कोसमतोंडी याला काल (ता. ८) अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीविरूध्द अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरेश बावणकर याने अनुसूचित जातीच्या संदर्भात अनेक आक्षेपार्ह पोस्ट केलीत. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राची अवमानना केली. फेसबुकवर गलिच्छ विचाराला अनेकांनी देखील सहमती दर्शविली. या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरेश ब्रावणकर सह इतर आरोपींचा शोध घेवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आंबेडकरी विचारमंचव्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलनाचा इशाराही आंबेडकरी विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्र परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी विश्वजीत डोंगरे, राजेश नंदागवळी, अजित मेश्राम, मिलिंद बागडे, किशोर मेश्राम, अतुल सतदेवे, हितेश डोंगरे, प्रविण बोरकर, अश्वजीत राऊत, भिमानंद मेश्राम, हिरालाल डोंगरे, शैलेश जांभुळकर, सलीम पठाण यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.डुग्गीपार पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आरोपी गौरेश बावणकर याला तातडीने अटक केली.दरम्यान न्यायालयाने १९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.





