31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता शासकीय कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लिपिकावर गुन्हा दाखल

शासकीय कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लिपिकावर गुन्हा दाखल

0
190

गोंदिया : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नियमानुसार पंच म्हणून नियुक्ती केल्यानंतरही त्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील वरिष्ठ लिपिकास चांगलेच महागात पडले आहे. सोमवारी (दि. ११) घडलेल्या या प्रकाराबद्दल रामनगर पोलिस ठाण्यात त्या लिपिकावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस निरीक्षक उमाकांत उगले (वय ४९) यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना गोपनीय कार्यवाहीसाठी वर्ग-३ चे दोन कर्मचारी (पंच) मिळण्यासाठी सोमवारी (दि. ११) पत्र दिले होते. यावर कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या पत्राद्वारे वरिष्ठ लिपिक अमित रमेश पवार (४५) यांना पंच म्हणून पाठवीत असल्याचे कळविले; तर पवार यांनीही नायक पोलिस शिपाई कापसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येत असल्याचे सांगितले. मात्र ‘मजिप्रा’च्या कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी
लागणारा पुरेसा कालावधी होऊनही पवार पोहोचले नाही. म्हणजेच, त्यांनी त्यांच्या कार्यालयप्रमुखांनी दिलेल्या आदेश व शासन निर्णयाची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याने रामनगर पोलिसांनी भान्यासं २०२३ कलम २२३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे