गडचिरोली -जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणा¬यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 29/06/2026 रोजी पोस्टे आरमोरी पोलीस पथकाने सापळा रचून अवैद्य देशी-विदेशी व हातभट्टी मोहा दारूची वाहतूक करणा¬या आरोपींविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 29/06/2026 रोजी पोस्टे आरमोरी येथील पोनि. कैलास गवते यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे राहुल टेंभुर्णे रा. आरमोरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली याने त्याच्या साथिदारांसह चारचाकी वाहनाने अवैद्यरित्या देशी-विदेशी व हातभट्टी मोहा दारूची वाहतुक करुन मौजा आझाद चौक आरमोरी येथील जिओ टॉवर जवळ चारचाकी वाहनामध्ये दारुसाठा लपवून ठेवलेला आहे. अशा मिळालेल्या माहितीवरुन पोस्टे आरमोरी येथील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी आझाद चौक, आरमोरी येथील जिओ टॉवर जवळील खुल्या मैदानावर छापा टाकला असता, दोन अनोळखी इसम पांढया रंगाच्या प्लॅस्टीक कॅनसह मिळून आल्याने पोलीस पथकाने पंचासमक्ष त्यांचे नाव विचारले असता, त्यांनी आपले नाव 1) प्रविण भाऊराव खोब्राागडे, वय 31 वर्षे, रा. फुले वार्ड, आरमोरी ता. आरमोरी, जि. गडचिरोली व 2) रुपेश रेखचंद ठवरे, वय 29 वर्ष रा. आझाद चौक, आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे सांगितले. यानंतर पोलीसांनी त्यांना बाजुला असलेल्या तिन चारचाकी वाहनांबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचे तिन्ही चारचाकी वाहन हे राहूल टेेंंंभूर्णे याचे असल्याचे सांगितले.
ृ
यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर तिन्ही चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहनांमध्ये 1) 500 एम.एल मापाचे हेवड्र्स 5000 प्रिमियम स्ट्राँग बियरच्या 10 सीलबंद खरड्याचे बॉक्स प्रति बॉक्समध्ये 24 नग बियर टीन प्रमाणे 240 नग बिअर एकूण किंमत 72000/- रुपये, 2) 180 एम. एल. मापाचे रॉयल चॅलेंज प्रिमियम वीस्की विदेशी कंपनीचे 01 नग सीलबंद दारूचे बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये 48 नीपा एकूण किंमत 16,800/- रुपये, 3) 180 एम एल मापाचे रॉयल स्टॅग कंपनीचे विदेशी दारूच्या 01 सीलबंद दारूचे बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 नीपा या प्रमाणे किंमत 16,800/- रुपये 4) 2 लिटर मापाचे रॉयल स्टॅग कंपनीचे विदेशी दारूच्या 01 सीलबंद दारूचे बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये 06 बॉटला एकूण किंमत 21,000/- रुपये, 5) 90 एम एल रॉकेट बडीशेप देशी दारू प्रत्येकी 01 बॉक्समध्ये 100 बाटल्या एकूण किंमत 8,000/- रुपये, 6) 90 एम एल रॉकेट संत्रा देशी दारू 07 बॉक्समध्ये प्रत्येकी 100 बाटल्या एकूण 700 बाटल्या एकूण किंमत 56,000/- रुपये, 7) 90 एम एल टायगर संत्रा देशी दारू 07 बॉक्स एकूण 100 बाटल्या एकूण 700 बाटल्या एकूण किंमत 56,000/- रुपये, 8) 2 लिटर मापाचे रॉयल स्टॅग कंपनीचे विदेशी दारूच्या 103 बाटल्या एकूण किंमत 3,60,500/- रुपये, 9) 500 एम.एल मापाचे टुबर्ग प्रिमियम स्ट्राँग बियरच्या 01 सीलबंद खरड्याचे बॉक्स प्रति बॉक्समध्ये 24 नग एकूण किंमत 7200/- रुपये, 10) 180 एम एल मापाचे रॉयल स्टॅग कंपनीचे विदेशी दारूच्या 02 सीलबंद दारूचे बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये 48 नीपा एकूण किंमत 33,600/- रुपये व 11) 20 लिटर क्षमतेचे 02 कॅन हातभट्टी मोहा दारू 40 लिटर एकूण किंमत 8,000/- रुपये असा एकूण 6,55,900/- रुपयांचा देशी-विदेशी व हातभट्टी मोहा दारुचा मुद्देमाल तसेच अवैद्य वाहतूकी करीता वापरण्यात आलेले 12) महींद्रा कंपनीचे टि.यू.व्ही 300 वाहन क्र. एम.एच 49 सी.डी 0387 अंदाजे किंमत 7,00,000/- रुपये, 13) निसान कंपनीचे मॅग्नाईट वाहन क्र. एम.एच 40 सी. ए 9101 अंदाजे किंमत 5,00,000/- रुपये, 14) महिंद्रा कंपनीचे स्कॉरपीओ वाहन क्र. एम.एच 12 जे. एम 9991 अंदाजे किंमत 7,00,000/- रुपये व 15) सूझूकी कंपनीची बरगम स्ट्रीट दूचाकी वाहन क्र. एम.एच 33 ए. एफ. 6865 अंदाजे किंमत 70,000/- रुपये असा एकूण किंमत 26,25,900/- रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला आहे.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे आरमोरी येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 0264/2026 कलम 65 (अ), कलम 65 (ई), 98, 83 म.दा.का अन्वये आरोपी नामे 1) प्रवीण भाऊराव खोब्राागडे, वय 31 वर्षे, रा. फुले वार्ड, आरमोरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली 2) रुपेश रेखचंद ठवरे, वय 29 वर्षे, रा. आझाद चौक, आरमोरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली व पाहिजे असलेला आरोपी 3) राहुल कैलास टेंभुर्णे, वय अंदाजे 42 वर्षे, रा. इंदिरानगर बर्डी, आरमोरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी प्रवीण खोब्राागडे व रुपेश ठवरे यांना अटक करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालयापूढे हजर केले असता मा. न्यायालयाने 01 दिवसाचा पीसीआर मंजुर केला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. नरेश सहारे, पोस्टे आरमोरी हे करीत आहेत. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येऊन माहे जून 2026 या महिण्याभराच्या कालावधीतच गडचिरोली जिल्ह्रातील विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे अवैद्य दारु विक्री व वाहतूक प्रकरणी एकूण 287 गुन्हे दाखल करण्यात येऊन एकूण 1 कोटी 94 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी अवैद्य व्यवयांविरोधातील कारवाई अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोनि. कैलास गवते, पोउपनि. नरेश सहारे, पोहवा/पिल्लेवान, वालदे, तोरे, पोअं/सराटेे, झाडे, कुमोटी व चापोअं/बारहते यांनी पार पाडली.





