23.4 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home गुन्हेवार्ता दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या एकाने गळफास तर दुसरीने घेतले विष

दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या एकाने गळफास तर दुसरीने घेतले विष

0
21

लाखनी,दि.13ः- एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलीने आपआपल्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यातील मुलाने गळफास घेऊन तर मुलीने विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्क लावले जात आहेत.
प्रितम अनंत बघेले (१८) रा. सालेभाटा ता. लाखनी, वैष्णवी विनोद बुराडे (१८) रा.सोमलवाडा ता. लाखनी अशी मृतांची नावे आहेत. लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथे सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालय आहे.या शाळेत प्रितम आणि वैष्णवी हे वर्ग १२ वीचे विद्यार्थी होते. गुरुवारी सकाळ पाळीची शाळा सुटल्यानंतर दोघेही आपआपल्या गावी गेले. दरम्यान, प्रितमने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी उघडकीस आली. तर त्याच रात्री वैष्णवी बुराडे हिनेसुद्धा आपल्या घरी विष प्राशन केले. वैष्णवीने विष पिल्याचे कळताच कुटुंबियांनी आधी खासगी दवाखान्यात व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान वैष्णवीचा मृत्यू झाला. यातील प्रितम याचे वडील १५ वर्षांपूर्वीच वारले. घरी विधवा आई, आजी व भाऊ आहे. कुटुंबाची स्थिती हलाखीची असल्याने त्याचा भाऊ दुसरीकडे शिक्षण घेतो. दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्महत्ये मागच्या कारणांचा शोध लाखनी पोलिस घेत आहेत.