23.4 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home गुन्हेवार्ता लाच स्वीकारताना सरपंचाला अटक

लाच स्वीकारताना सरपंचाला अटक

0
30

भंडारा,दि.18ः- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतघरकुल बांधकामाकरिता मंजूर झालेल्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याकरिता २ हजारांची लाचेची मागणी करणार्‍या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाईबुधवारी (ता.१७) करण्यात आली.
नरेंद्र बारकू कुंभरे (३२) असे तुमसर तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतच्या सरपंचाचे नाव आहे. यातील तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे सन २0१७ मध्ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १ लाख ३0 हजारांचे घरकुल बांधकाम मंजूर झाले. सदर बांधकामाकरिता पहिला धनादेश ३0 हजार व दुसरा ७0 हजार असे एकूण १ लाख रुपयांचे दोन धनादेश नोव्हेंबर २0१७ मध्ये बांधकाम पूर्ण केल्यानंतर मिळाले. उर्वरित मंजूर रकमेपैकी ३0 हजार रुपयाचा धनादेश मिळणे बाकी होते.
सदर बाकी असलेले धनादेश मिळण्याकरिता ग्रामपंचायत लोहारा येथे विचारणा करून घरकुलाचे कागदपत्रांची पाहणी केली असता सदर प्रमाणपत्रावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी झाली असून सरपंचांची स्वाक्षरी होणे बाकी होते. तक्रारदारांनी सरपंच कुंभरे यांची भेट घेऊन स्वाक्षरी करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी २ हजार ५00 रुपयांची मागणी केली. त्यानंतरच प्रमाणपत्र व रोजगार हमीच्या मस्टरवर स्वाक्षरी करतो असे सांगितले. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीवरून सापळा रचण्यात आला. दरम्यान आरोपी सरपंचाने तडजोडीअंती २ हजार रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने आंधळगाव पोलिसांत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरक्षक योगेश्‍वर पारधी, सहाय्यक फौजदार गणेश पडवार, पोलीस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, पोलीस शिपाई अश्‍विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, कोमलचंद बनकर, रसिका कंगाले, दिनेश धार्मिक यांनी केली.