बांधतलाव शिवारात आढळला युवकाचा मृतदेह

0
4

गोंदिया,दि.19 -सूर्याटोला येथील बांध तलाव शिवारात गुरुवारी (दि.१८) सकाळी आठच्या सुमारास संशयास्पदस्थितीत युवकाचा मृतदेह आढळला. त्यामुळे त्याचा मृत्यूचे कारण हत्या की, अपघात याबद्दल चर्चा असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव ताराचंद देवकरण पालेवार (२७) परमात्मा एक नगर वॉर्ड असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, ताराचंद पालेवार हा एमएसईबीमध्ये रोजंदारीवर कामावर होता. दरम्यान, दीड वर्षापूर्वी नवीन निविदेनुसार त्याने नोकरीकरीता अर्ज करून टेक्नीशियन पदाचे ट्रेनिंग सुद्धा घेतले. परंतु, काही कारणामुळे सदर नोकरभरती रद्द झाली. त्यामुळे तो बेरोजगार झाल्याने नेहमीच आर्थिक कारणामुळे तणावत राहायचा. वडील देवकरण पालेवार यांच्या चहा टपरीच्या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू होता. अशात तीन दिवसापूर्वी ताराचंदच्या वडीलांचा मृत्यू झाला. तेव्हापासून तो खचलेल्या स्थितीत दारूच्या आहारी गेला होता.
दरम्यान, गुरुवारी ताराचंदचा मृतदेह बांध तलावाच्या सिमेंट आवारभितीजवळ आढळून आला. घटनास्थळी भिंतीवर रक्ताचे डाग, एक बिसलरी बॉटल, डोक्यावर टोपी व लाल रंगाच्या चपला आढळून आल्या. तसेच त्याच्या शरीरावर जखमा आढळल्या. यामुळे ताराचंदची हत्या की अपघात, याबद्दल शहरात चर्चेला उधान आले आहे.
दरम्यान, रामनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवालातूनच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.