23.4 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home गुन्हेवार्ता बोंडगाव नजीक दोन दुचाकी धडकल्या, एक जागीच ठार

बोंडगाव नजीक दोन दुचाकी धडकल्या, एक जागीच ठार

0
29
अर्जूनीमोर,दि.19(संतोष रोकडे)- तालुक्यातील बोंडगाव चान्ना रस्त्यावर आज दुपारी दोन दुचाकींची सामोरासामोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.राजेश गंगाधर  दिरबुडे (45) राहणार बोंडगाव देवी असे मृताचे नाव आहे. तर देवदास मेश्राम, राहणार बोंडगाव देवी हे गंभीर जखमी असून त्यांचेवर भंडारा येथे उपचार सुरू आहेत. इतर दोन जण किरकोळ जखमी झाले.अर्जूनीमोर पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद असून ठाणेदार पी बी भस्मे याचे मार्गदर्शनामध्ये पुढील तपास हवालदार कन्नाके करीत आहेत.