अमरावतीच्या जीएसटी उपायुक्तास लाच घेतांना अटक

0
12

अमरावती, दि.16ः-अमरावती येथील विभागीय जीएसटी कार्यालयातील उपायुक्तांना गुरूवारी दीड लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली.मुकुंद विश्वास तेलगोटे
32, असे अटक करण्यात आलेल्या जीएसटी उपायुकतांचे नाव आहे. मुकुंद तेलगोटे यांनी अमरावती येथील व्यावसायिकास एका प्रकरणी दीड लाख रुपयांची लाच मागीतली होती. व्यापाऱ्याने नागपूर येथील सीबीआय कार्यालयात तेलगोटे यांची तक्रार केली होती. तक्रारीवरून सीबीआयच्या पथकाने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने सापळा रचून मुकुंद तेलगोटे यांना अटक केली.