छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपी काही तासातच जेरबंद

0
23

गोंदिया,दि.२४ मे : शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या छोटा गोंदिया येथे मित्रानेच आपल्या मित्राचा धारदार चाकूने खून केल्याची घटना २३ मे च्या रात्रीला घडली होती.घटनेनंतर आरोपी मित्रांने घटनास्थळावरुन पोबारा केेला होता.त्या आरोपीला गोंदिया शहर पोलिसांच्या पथकाने काही तासातच शोध घेत ताब्यात घेतले. राहुल दिलीप बिसेन वय 22,रा. छोटा गोंदिया याचा आरोपी  प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर वय 23, रा. जितेश चौक, छोटा गोंदिया यांने किरकोळ भांडणावरून पोटावर, छातीवर व कोथ्यावर धारदार चाकुने वार केल्यामुळे राहुलचा जागीच मृत्यू झाला.

मृतकाचे वडील दिलीप जिवनलाल बिसेन रा. छोटा गोंदिया यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रं. 332/2024, कलम 302 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील आरोपी- प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर हा खुन केल्यानंतर घटनास्थळावरुन पळुन गेला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. गुन्हयाचा प्राथमीक तपास पोउपनि मंगेश वानखडे यांनी केला असुन गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीनी बनकर करीत आहे.

सदरची कारवाई पो. ठाणे गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे पथक सपोनि सोमनाथ कदम, सपोनि विजय गराड, सपोनि संजय पांढरे, पोउपनि मंगेश वानखडे, पोउपनि घनश्याम थेर, मपोउपनि पुजा सुरळकर, पोहवा कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, श्याम कोरे, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, सनोज सपाटे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सपोनि विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्णे, पोहवा राजु मिश्रा, महेश मेहर, संतोष केदार, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, अजय रहांगडाले, चालक गौतम यांनी कामगिरी केली.