शिष्यवृत्ती साठी साठ टक्केच रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर

0
6

गडचिरोली,दि.15 : ओबीसी मंत्रालयाद्वारे विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाने ५० टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला , मात्र त्या मध्ये सुधा शासनाने ५० टक्के रकमेत अवघे ६० टक्के रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण वर्तुळात ओबीसी विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहे.
सामाजिक विभागाला वेगळा न्याय ? आणि ओबीसी मंत्रालयाला वेगळा न्याय का असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे , कल्याण विभाग मार्फत ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता पेहल्या सहामाह करिता शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क व  शिष्यवृत्ती देण्यात येणाऱ्या ५० टक्के येणाऱ्या रकमेत अवघे ६०  टक्के आधार लिंक संगलित खात्यावर जमा करण्याच्या निर्णय शासनाने नुकताच घेतलेला आहे म्हणजेच ओबीसी विद्यार्थ्यांना मंजूर झालेला ५० टक्के रकम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न होता त्यातूनही कपात करून अवघे ६० टक्के जमा करण्यात येणार आहे , त्यामुडे विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष पसरला आहे , शासनाने जुने ऑनलाइन पोर्टल बंद करून नवे पोर्टल महाडीबीटी हे या वर्षापासून सुरू केले आहे, हे नवीन पोर्टल कुचकामी ठरलेले असून यात संपूर्ण माहिती पूर्णपणे भरले जात नाही , विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे सुद्धा अपलोड होत नाही  येत्या मार्च महिन्यात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी विद्यार्थी संघटनेचे रुचित वांढरे , सुरज डोईजड , किरण कटरे , करन ढोरे ,विपुल मिसार , शुभम चापले ,बादल गडपायले, तुषार वैरागडे , राहुल भांडेकर , अरुण निखुरे , चेतन शेंडे , नितीन कोतकोंडावार परमानंद पुनमवार यांनी दिला आहे