24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home गुन्हेवार्ता व्हॉट्सअप ग्रुप वर अश्लिल फोटो असलेली लिंक पाठविल्यावरून दोघांना अटक

व्हॉट्सअप ग्रुप वर अश्लिल फोटो असलेली लिंक पाठविल्यावरून दोघांना अटक

0
40

ब्रम्हपुरी,,दि.१९: : ब्रम्हपुरी तालुक्यात एका सार्वजनिक व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लिल पोस्ट केल्याने सर्वत्र खडबड उडाली आहे. ब्रम्हपुरीत व्हॉट्सअप ग्रुप वर अश्लिल फोटो संबंधात ही सलग तिसरी मोठी घटना आहे. सविस्तर असे की, ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील अमर गाडगे हे एक वर्षापासून व्हॉट्सअप ग्रुप चालवत असून त्यांच्या ग्रुपमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. याच व्हॉट्सअप ग्रुप मध्ये १८ मार्च रोजी रवी वालदे राहणार पाथरी व तसेच १९ मार्च ला तुषार सोनूले केवाळा,ता. चिमूर यांनी ग्रुपमध्ये अश्लिल फोटो असलेली लिंक पाठविल्याने ग्रुप ऍडमिन अमर गाडगे यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारे संबंधित पोस्ट करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना अटक करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.