26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता कोटगाव जुगाड़ अड्यावर मौदा पोलीसांची धाड़

कोटगाव जुगाड़ अड्यावर मौदा पोलीसांची धाड़

0
14

मौदा,(प्रा.शैलेष रोशनखेडे)दि.23ः- तालुक्यातील कोटगाव येथे मौदा पोलीसांनी घातलेल्या धाडीत 1 लाख 70 हजार 858 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जुगार खेळणार्यांना अटक करण्यात आली आहे.पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार कोटगाव शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याच्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक आशिफ शेख यांच्या मार्गदर्शनात  psi टापरे , अरविंद भगत व त्यांची चमूने धाड घातली.यावेळी सहाजणांना जुगार खेळतांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्याचेकड़ून पाच मोबाईल 17000 रुपये, गाड़ी क्र. mh 40 ay 6716, mh 40 t 4943  किंमत 65000 तसे नगदी 8118 रुपये व 52 तास पत्ते 40 रुपये व चारचाकी वाहन क्रमांक mh cn 7689 किंमत 80,000 असे एकूण 170858 लाखाचा माल जप्त करण्यात आला.पकडलेल्यामध्ये विलास रोड रा.धानला,दशरथ लांजेवार रा.धानला, एजाज शेख भंडारा, मयूर नेलकर रा.सिंगोरी, नजीम खान शाहपुर, आकाश मेश्राम  खरबी यांचा समावेश आहे.