30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

0
21
नेहमीप्रमाणे आपल्या शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. शेतात फिरत असताना विद्युत मोटारपंपजवळ गेले असता त्या ठिकाणी पडलेल्या जिवंत विद्युत तारांवर अचानक त्यांचा पाय पडल्याने त्यांना विद्युत प्रवाहाचा झटका लागला. झटका इतका जोरदार होता की, त्याच त्यांचा जागीच मृत्यू झाला. भोजराज मेंढे यांच्याकडे दोन एकर शेतजमीन असून या शेतातील पिकावर भोजराजच्या कुंटुंबियांचा उदरनिर्वाह चालत असे. त्यांच्या कुटुंबात पत्नीसह दोन मुले व परितक्त्या असलेली मुलगी आहे. सकाळी शेतात गेलेले वडील सायंकाळ झाली तरीही परतले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा गिरजाशंकर मेंढे याने शेतात जाऊन बघितले असता वडील शेतात मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील व उपसरपंच यांना दिली. पोलीस विभागाला सूचना दिली असता पोलीस अधिकारी यांनी शेतात घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.