26.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home गुन्हेवार्ता एमएसईबीचा निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

एमएसईबीचा निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

0
19

गोंदिया,दि.13ः- तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील एका विवाहित महिलेला विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली.सविस्तर असे की अनिता अनिल नेवारे(वय 30) ही महिला दुपारच्या सुमारास विहीरीवरून गुंडीमध्ये पाणी घेऊन घराकडे येत असतानाच विजेचे तार अंगावर पडल्याने विद्युत प्रवाहामुळे जीव गमवावा लागला.विज वितरण कंपनीकडे विद्युत तार व्यवस्थित करण्यासबंधी अनेकदा माहीती देऊनही केले नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सदर मृत महिलेच्या कुटुंबियांना विज वितरण कंपनीने तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.