जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळय़ात

0
9

गडचिरोली,दि.29ः-कंत्राटदाराचे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत केलेल्या जुन्या कामाचे देयके काढून देण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या ग्रामीण पुरवठा उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारला अटक केली. रमेश सोमाजी शेंडे (५२) असे अटक करण्यात आलेल्या उपविभागीय अभियंत्यांचे नाव आहे.
ग्रामपंचायतीअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठय़ाची कामे केलेल्या कंत्राटदाराने जुने देयके पास करण्यासाठी शेंडे याच्याकडे गेले असता त्यांनी २ टक्के मोबदला म्हणून कंत्रदारास सहा हजार रूपाची मागणी केली. मात्र कंत्राटदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोनापूर परिसरातील राजस्व संकूल परिसरात सापळा रचून पंच साक्षीदारासमक्ष शेंडे याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्ष्क पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुध्धलवार, अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र नागरे, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थु धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकवार, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, तुळशिदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, सोनी तवाडे यांनी केली.