कारमध्ये पकडली दीड लाखांची दारू

0
13

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.29ः-. शहरातील परवाना असलेल्या दारू दुकानातून दारू विकत घेऊन ती दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कारमध्ये विक्रीकरिता नेत असलेल्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. आज बुधवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान पोलिसांच्या विशेष पथकाने माहितीच्या आधारे सापळा रचला. दरम्यान दिलीप असन्ना कुचनकर(29) रा. आंबेडकर वॉर्ड वडसा आणि मुकेश दुपारे(25) भगतसिंग वॉर्ड वडसा, अनिल माधवराव निमजे(25) आंबेडकर वॉर्ड वडसा यांना शिवप्रसाद जयस्वाल महाविद्यालयाजवळ पकडले.वाहन थांबवून झडती घेतली असता 90 मिली देशी दारूच्या दिड लाख रुपयांची दारू आणि 5 लाख रुपयांची कार असा एकूण 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अर्जुनी मोरगाव पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार थेर, तुरकर, कावळे, पटले, बिसेन, बोपचे, रहांगडाले, मेश्राम, कुरसुंगे यांनी केली