23.8 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home गुन्हेवार्ता बंदूक ताणून प्लॉटवर अवैध कब्जा

बंदूक ताणून प्लॉटवर अवैध कब्जा

0
26

.गोंदिया,दि.08 : शहरात अवैध जमीन खरेदी-विक्रीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे. खुल्या प्लॉट, जमिनीवर नजर ठेवून भूमाफिया दबंगगिरीने कब्जा करून संबंधितांशी साटेलोटे साधून अवैधरित्या विक्री करीत आहेत. शहरातील रिंगरोड परिसरात ७८ वर्षीय फिर्यादीच्या खरेदी केलेल्या प्लॉटवर तीन आरोपींनी अवैधरित्या कब्जा करून तसेच फिर्यादीच्या कानशिलावर बंदूक ताणून जबर मारहाण केली. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुमारास उघडकीस आली. ५ डिसेंबर रोजी ११ वाजता सुमारास फिर्यादी शामभाऊ इंद्रराज डोये (७८) रा. डोये भवन रेलटोली हे रिंगरोड परिसरातील खरेदी केलेल्या प्लॉट पाहण्याकरिता गेले होते. यातच राजू तिवारी, त्याचे दोन साथीदार प्लॉटवर अवैध कब्जा करताना दिसून आले. दरम्यान, फिर्यादीने आरोपींना हटकले असता आरोपींनी प्लॉट स्वत:च्या मालकीचे असल्याचे सांगून शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या कानशिलेवर बंदूक ठेवून धमकी दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात भूमाफिया सक्रीय असल्याची चर्चा सुरू असून प्लॉट, जमीन मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे