24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता रानडुकराचा शिकार करणारे चौघे ताब्यात

रानडुकराचा शिकार करणारे चौघे ताब्यात

0
28

सालेकसा,दि.25: तालुक्यातील मक्काटोला येथे शेतशिवारात विजेच्या जिवंत तारा टाकून रानडुकराचा शिकार करून त्याचे मास खाणाèया चौघांना सालेकसा वनविभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई २३ डिसेंबर रोजी करण्यात आली. आरोपी राजाराम मरकाम रा. मक्काटोला याच्या घरातून शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, हत्यार आणि मांसाचे तुकडे आढळून आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजाराम रामचंद मरकाम( ४२, रा. मक्काटोला), धर्मेंद्र गोपिचंद मरकाम (वय २७ रा. कुंभारटोली ता. आमगाव), राजेंद्र बसंतराव बारसे(४२ रा. मक्काटोला) चुन्नीलाल सदाराम वरखडे( ४३ रा. मक्काटोला) अशी नावे आहेत. आरोपींनी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही आरोपींना ५ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी ए.बी. इलमकर यांच्या नेतृत्वाखाली सालेकसा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी आणि कर्मचाèयांनी केली.